केंद्रीय अर्थसंकल्प 2025 च्या आधी शेअर बाजारात घसरणीचे वातावरण आहे. यातच देशातील वस्तूंचा खप वाढवण्यासाठी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करू शकते, ज्याचा शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारातील सेंटिमेंट सुधारू शकेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
अर्थसंकल्पात उपभोग वाढवण्याच्या उपाययोजनांमुळे अनेक क्षेत्रांत वाढ होईल, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. डिसेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपभोग वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञांनी दिला होता. सरकारने उपभोग वाढवण्यासाठी उपाययोजना केल्यास त्याचा फायदा एफएमसीजी, वाहन, कंझ्युमर ड्युरेबलसह अनेक क्षेत्रातील कंपन्यांना होईल.
कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी?

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी L&T, Ultratech Cement, Tata Motors, M&M, Hero MotoCorp, Adani Green Energy, HUL आणि ITC यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास अर्थसंकल्पानंतर चांगला नफा मिळू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे.
L&T शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात या शेअरचा परतावा कमी झाला आहे. कंपनीचा IPO लिस्ट झाल्यापासून या शेअरने 19,000 टक्के परतावा दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर बांधकामाशी संबंधित कामांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा L&T ला होणार आहे.

तसेच ITC ही FMCG क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात उपभोग वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा थेट फायदा ITC ला होणार आहे. ITC शेअरने गेल्या एका वर्षात 4 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
