सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द – चंद्रकांत पाटील

काल मोठ्या उत्साहात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील संवाद साधला.

शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे.सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.