इचलकरंजीत उद्या रास दांडीया स्पर्धा

ताराराणी पक्षाच्या महिला आघाडीतर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (ता. २८) दुपारी चार वाजता फक्त महिलांसाठी भव्य रास दांडीया स्पर्धा होणार आहे. यामध्ये स्पॉट गेम्स, लकी ड्रॉ यासह विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे, अशी माहिती अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांनी दिली.

स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर ही स्पर्धा होत आहे. त्यामध्ये बेस्ट दांडीया, बेस्ट ग्रुप दांडीया, बेस्ट गरबा, बेस्ट ग्रुप गरबा, बेस्ट ड्रेसिंग आणि बेस्ट ग्रुप ड्रेसिंग अशा बक्षिसांची लयलुट असणार आहे.