करगणी आत्महत्याप्रकरणी एकावर खंडणीची फिर्याद

आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी चार जणांना अटक झाली असतानाच दरम्यान ऑडिओ क्लिप व्हायरल शोधकामी धनाजी शंकर माने (वय २३,रा. बनपुरी, मूळ गाव येडेनिपाणी, ता. वाळवा ) यांनी महेश सरगर पन्नास हजार रुपये खंडणी मागितल्याप्रमाणे आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

संबधित अल्पवयीन मुलीची आत्महत्येचे घटना ७ जुलै रोजी घडली. त्यानंतर राजू विठ्ठल गेंड , रामदास गायकवाड , रोहित सर्जेराव खरात, अनिल नाना कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. संबंधित चारही आरोपी अटकेत असतानाच याप्रकरणी महेश पोलीस स्टेशनमध्ये आग्रही होता. तसेच कर्गणीतील रस्ता रोको प्रकरणीही तो पुढे होता. दरम्यान त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये तो धनाजी शंकर माने याला गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव न येण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मानेचा शोध घेतला. त्यानंतर धनाजी माने याने आटपाडी पोलिसात फिर्याद दिली .