जुनेखेडचा दोन तास गावासाठी उपक्रम! तरुणांच्या सहभागाने गावाचा कायापालट…..

सध्या गावागावात स्वच्छतेच्या बाबतीत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. ज्यामुळे गावचा विकास होण्यास मदत होत आहे. वाळवा तालुक्यातील जुनेखेड  ग्रामपंचायतीने सुरू केलेला दोन तास गांवासाठी उपक्रम राज्यासाठी पथदर्शी ठरत आहे. स्वच्छता, श्रमदान, वृक्षारोपण, सांडपाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन या गोष्टीमुळे गावाचा कायापालट झाला आहे. श्रमाचा वसा घेऊन तरुणाई राबवत आहे.

गावातील सर्व खेळाडूंसाठी, युवकांसाठी, स्पर्धा परीक्षा मैदान तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तसेच मंदिर परिसरात निवांत क्षण घालवणाऱ्या अवाल वृद्धासाठी भैरवनाथ मंदिर येथील परिसर आणि मैदान (क्रीडांगण) स्वच्छता केली जाते. नितीन पाटील, हणमंत पाटील मोहन पाटील, कृष्णकुमार पाटील, दत्तात्रय पाटील, अरुण निकम, राहुल पाटील, नामदेव पाटील, विशाल पाटील, संतोष आंबी, हरिचंद्र पाटील, सुभाष पाटील, गणेश पाटील, संतोष हजारे, चंद्रकांत निकम, अभिषेक निकम, विनायक जाधव, रणजीत जाधव, संग्राम पाटील, विदेश पाटील, प्रशांत तोडकर, सोपान पाटील, सर्जेराव पाटील,

आणि सर्व युवक खेळाडू ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. संभाजी पाटील काका, निलेश पाटील, सहदेव पाटील, जयवंत पाटील यांनी ही यावेळी सहभाग नोंदविला. याबाबत लोकनियुक्त सरपंच प्रियांका राहुल पाटील म्हणाल्या, या उपक्रमास सर्वांच्या सहकार्याने सलग २ वर्ष पूर्ण होत आहेत.