कोल्हापुरात प्रथमच भव्य संगीत सोहळा होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बहारदार, प्रयोगशील संगीतामुळे घराघरात पोहोचलेले, महाराष्ट्राचे लाडके संगीतकार-गायक अजय-अतुल यांच्या कोल्हापुरातील लाईव्ह शोला अवघे काही दिवस उरले आहेत.येत्या 2 फेब-ुवारी रोजी होत असलेल्या या शोची जोरदार तयारी सुरू असून शहरातील वातावरण संगीतमय झाले आहे.
कोल्हापुरात प्रथमच होत असलेल्या या भव्य संगीत सोहळ्यासाठी शहरात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महासैनिक दरबार मैदानावर सायंकाळी 7 ते 10 दरम्यान हा शो होणार आहे. दुर्गामाँ एंटरटेन्मेंटने आयोजित केलेल्या या शोचे मुख्य प्रायोजक पीएनजी ज्वेलर्स असून चितळे डेअरी हे पॉवर्ड बाय प्रायोजक तर दैनिक पुढारी माध्यम प्रायोजक तर रेडिओ पार्टनर टोमॅटो एफएम आहे.
अवघ्या तीनच दिवसांवर आलेल्या या शोच्या तिकीट विक्रीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या ऐतिहासिक लाईव्ह इन कॉन्सर्टचे साक्षीदार होण्याची इच्छा प्रत्येकाला आहे. त्यामुळे शोच्या तिकीट खिडकीवर गर्दी वाढली आहे. तिकिटे मर्यादित असल्यामुळे ज्यांना या संगीत सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी तत्काळ आपली तिकिटे बुक करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘चंद्रमुखी’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर या शोमध्ये सूत्रसंचालक असणार आहे.
हे या शोचे आणखी एक आकर्षण आहे. सोबत दिलेल्या क्यूआर कोडवर तिकिटे बुक करता येतील. तसेच खालील ठिकाणी ऑफलाईन तिकीट कार्यक्रम स्थळ महासैनिक दरबार येथील बॉक्स ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत.