प्रत्येक गावागावात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. जेणेकरून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला लाभ होईल. गोरगरिबांना आधार मिळेल. असाच एक उपक्रम पेठवडगाव येथील संयुक्त शाहू तालीम यांच्या वतीने राबविण्यात आला. पेठ वडगाव येथील संयुक्त शाहू तालीम ६ व्या वर्धापदिन निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून अवधुत मतिमंद मुलांची शाळा अंबप ता. हातकणंगले येथील मुलांना खावूचे वाटप करण्यात आला.
संयुक्त शाहू तालमीच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात यामध्ये रक्तदान शिबीर, छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव, गणेश उत्सव, समाज प्रबोधन करण्यासाठी व्याख्यान, विविध स्पर्धा, महिलांच्या साठी विशेष कार्यक्रम असे अनेक सामाजिक उपक्रम या ग्रुपच्या वतीने घेतले जातात अशी माहिती शाहू तालमीचे अध्यक्ष यांनी दिली.
संयुक्त शाहू तालीम यांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी वडगाव परिसरातून अतिशय चांगले पाठबळ मिळत असून व हे पाठबळ पुढील सर्वच सामाजिक उपक्रमासाठी मिळत राहावे अशी आशा तालमीच्या सर्व सदस्यांच्या वतीने केली. या उपक्रमासाठी संयुक्त शाहू तालमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या कार्यासाठी कायमच ज्येष्ठांचे मार्गदर्शन आम्ही देत असतो असे प्रतिपादन तालमीच्या सर्व जेष्ठयांनी केले.
६ व्या वर्धापदिना निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून अवधुत मतिमंद मुलांची शाळा अंबप याठिकाणी मुलांना खावू वाटप करून युवा पिढीला प्रेरणादायी संदेश यातून मिळेल तसेच संस्थेच्या वतीने गोशाळा मुलांना कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन व मुलांच्या वतीने तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन अश्या अनेक उपक्रमासाठी युवा वर्गाने पुढे यावे असे संस्थेच्या ट्रस्टी शिल्पा हुजरबाजार, सेक्रेटरी स्वाती गोखले व मुख्याध्यापिका शुभांगी शेंडगे यांनी व्यक्त केले. यावेळी किरण खटावकर, विधी सेवा प्राधिकरण सचिव इगळे साहेब, प्रभाताई भागवत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संयुक्त शाहू तालमीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.