सांगोल्यात आज श्री. अंबिकादेवी यात्रेनिमित्त शेतीमालाचे प्रदर्शन तसेच शेळ्या मेंढ्या व सर्वप्रकारचा भरणार बाजार

सध्या सांगोल्यात श्री आंबिकादेवीची यात्रा सुरु आहे. या यात्रेनिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री. अंबिकादेवी यात्रा निमित्त शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर्स अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला यांचेवतीने देण्यात आली.

आज शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी शेळ्या मेंढ्या व सर्वप्रकारचा बाजार भरणार आहे. रविवार दि. २ फेब्रुवारी व सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सर्व प्रकारचा बाजार व विविध स्पर्धा होणार आहेत. मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी महापूजा, महानैवेद्य व रात्री ९ वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गुरुवार दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. शेतीमालाची निवड करण्यात करण्यात यणार आहे.