आज माघी गणेश जयंती निमित्त प्रत्येक भागात अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. अनेक मंडळात हि गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आष्टा येथील श्री चौंडेश्वरी मंदिरातील श्री गणेश मंदिरात शनिवार, दि. १ रोजी माघी गणेश जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आडमुठे यांनी दिली. ते म्हणाले, मंदिरात गणेश जयंतीनिमित्त सकाळी ६:०० वाजता श्रींचा अभिषेक व आरती, ११:०० ते १२:३० कृष्णात् कुंभार महाराज यांचे प्रवचन, दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी जन्मकाल पुष्पवृष्टी होणार आहे.
आष्टा येथे आज माघी गणेश जयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे नियोजन
