Gold Silver Rate Today 2 February 2025 : Budget नंतर सोने-चांदीची काय अपडेट?

Budget 2025 मध्ये करदात्यांना मोदी सरकारने एकदाचे भरभरून दिले. तर दुसरीकडे अप्रत्यक्ष करात वाढीची भीती पण आहे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराने नाराजी जाहीर केली. आता सोने आणि चांदीच्या बाजारात या बजेटचा काय परिणाम झाला हे सोमवारी प्रकर्षाने दिसून येईल. शनिवार आणि रविवार आल्याने या क्षेत्रातील प्रमुख संस्थांनी किंमती जाहीर केल्या नाहीत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत.

गेल्या महिन्यात सोन्याने जवळपास 6 हजारांची भरारी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे 170 आणि 320 अशी 490 रुपयांची स्वस्ताई आली. तर 29 जानेवारीला सोने 920, 30 जानेवारीला 170 तर 31 जानेवारी रोजी 131 रुपयांनी महागले. काल भावाची अपडेट मिळाली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 77,460 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जानेवारी महिन्यात चांदी अनेकवेळा दरवाढीच्या ट्रॅकवरून घसरली. तर महिना अखेरीस 24 जानेवारीला 1 हजारांची दरवाढ तर 27 जानेवारीला 1 हजारांची घसरण झाली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. 31 जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. 1 फेब्रुवारी रोजी किंमतीत अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,600 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 82,086, 23 कॅरेट 81,757, 22 कॅरेट सोने 75,191 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 61,565 रुपये, 14 कॅरेट सोने 48,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,533 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.