आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे दि. १९ ते २४ डिसेंबरपर्यंत ‘गाव की ओर’ हा सुशासन सप्ताह आटपाडी तहसील कार्यालयाकडून साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने दिघंची ग्रामपंचायत येथे दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आटपाडी तहसील कार्यालय व पुरवठा विभागामार्फत दिघंची ग्रामपंचायत येथे सुशासन सप्ताहानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रेशन कार्ड व दिघंची महासेवा केंद्रअंतर्गत शैक्षणिक दाखले वाटप करण्यात आले.
सुशासन सप्ताह मेळाव्याचे सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते व रेशन कार्ड व दाखल्यास संबंधित ज्या अडचणी असतील त्या जागेवर सोडवल्या गेल्या. एकाच जागी अनेक कामे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यासाठी नागरिकांची गर्दी होती. दिघंची महा-ई-सेवा केंद्रामार्फत उत्पन्न, डोमासाईल, जातीचे दाखल्यासह विविध तयार असणारे दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.