हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार, असा प्रश्न रुकडीतील नागरिकांकडून होत आहे. गावचा उरुस या रस्त्यावर भरत असतो, त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे
रुकडीत रस्त्याची दुरवस्था कायम
