पट्टणकोडोलीत होम मिनिस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पट्टणकोडोली , हातकणंगले येथील वजीर ज्वेलर्सतर्फे जय लॉनमध्ये खास महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी समीना मुल्ला यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात वजीर ज्वेलर्सतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी सुवर्णा दुर्गे, प्यारनबी मुल्ला, नीता मोरे, छाया कोळी व स्वामी समर्थ महिला मंडळाच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी होम मिनिस्टर स्पर्धेत स्वाती शेळके, कुलसुम शिकलगार, सविता भाणसे, समृद्धी मोहिते, लक्ष्मी बाणदार, अंजली मोहिते, प्रियंका माळी, संयुक्ता पाटील, आरती कडोली, स्नेहा मधाळे आदींनी होम मिनिस्टर हा बहुमान पटकावून प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. स्पर्धेत होम मिनिस्टर फेम प्रल्हाद पाटील (कोल्हापूर) यांनी उपस्थित महिलांचे मनोरंजन करीत महिलांचे सहभागातून खेळ सादर करत मानाच्या पैठणीसाठी विजेत्या होम मिनिस्टरची निवड करण्यात आली. स्पर्धेदरम्यान रिलस्टार पिया नाझरे, वसगडे येथील शितल देवमामा यांनी उपस्थिती लावून स्पर्धेत जोश निर्माण करुन महिलांची मने जिंकली. अल्ताफ मुल्ला यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश नाझरे, जालंदर जाधव, लक्ष्मण पुजारी, सचिन आवटे, अनिल दुर्गे, सचिन पाटील, अजय शिरगुप्पे यांच्यासह डी. जे. मॉर्निंग ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.