लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. त्यासाठी तयारी देखील काही पक्षांकडून सुरु झालेली आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालयमध्ये झालेले जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या पत्राद्वारे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारणी सदस्यपदी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
देवराजदादा पाटील म्हणाले, वैभव शिंदे हे अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत यामुळे त्यांच्याअनुभवाचा फायदा पक्ष संघटना तसेच शरदचंद्र पवार यांचे विचार बळकटिसाठी होईल. वैभव शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आभार मानून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. भविष्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष बळकट करू आपला पक्ष नक्कीच चांगली कामगिरी करेल.
मिळालेल्या संधीचा नक्कीच योग्य उपयोग करून संघटना तळागाळापर्यंत पोहोचवणे पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. यावेळी अनिता सगरे, सुस्मिता जाधव, कमल पाटील, ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनुरकर, विजय पाटील, आनंदराव पाटील, अमोल शिंदे, दिलीपराव वग्याणी, टि.व्ही. पाटील, विश्वास पाटील आदि मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. राजू पाटील यांनी आभार मानले.
