विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला. त्यांनी आपला पदभार स्वीकारून विकासकामांचा धडाका सुरु केलेला आहे. ६ फेब्रुवारी रोजी सांगोला येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र,सोलापूर यांच्यामार्फत निरंतर शिक्षण कार्यक्रम (C.M.E.)याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील तज्ञ व्याख्याते यांनी क्षयरोग (T.B.) निर्मूलनासाठी अत्याधुनिक उपचार आणि उपाययोजना यांवर सांगोला तालुक्यातील डॉक्टरांना सखोल मार्गदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख,जिल्हा क्षयरोग अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी ,वैद्यकीय अधीक्षक ,सांगोला तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांच्या प्रमुख उपस्थितीमध्यें केले होते.समस्त सांगोला डॉक्टर्स असोसिएशन – आय.एम.ए.,निमा, होमिओपॅथी ,डेंटल,सांगोला मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला हृदयरोगतज्ञ डॉक्टर आमदार, सांगोला विधानसभा सदस्य, नवनिर्वाचित लोकप्रिय नूतन “आमदार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख( एम.डी. डी. एन. बी. हृदयरोग) यांचा सपत्नीक जाहीर भव्य नागरी सत्कार सोहळा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, पुष्पहार,शाल,पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात हॅप्पी पार्क चौपाटी,वासुद रोड, सांगोला येथे पार पडला.
सत्कार सोहळा प्रसंगी सर्व डॉक्टरांना संबोधित करताना डॉ.देशमुख म्हणाले की,वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे प्रश्न अडीअडचणी, दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले.सर्व डॉक्टरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
