पळशीत आज कीर्तनाचे आयोजन

आपल्यापैकी बरेचजण हे पंढरीचे वारकरी आहेत. अनेकांना कीर्तनाची आवड देखील आहे. खानापूर तालुक्यातील पळशी येथे आज शनिवारी छाया जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिवचरित्रकार गौरीताई महाराज पंढरपूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे. दि. ८ रोजी सायंकाळी नऊ वाजता होणाऱ्या या कीर्तन सोहळ्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.