नोकरीच्या त्रासाला कंटाळून अनेक जण स्वत:चा व्यवसाय करण्याचा प्रयत्नात असतात. पण आर्थिक स्थिती नसल्याने आणि कर्ज घेतलं तर व्याजाचं टेन्शन सतावत असतं. त्यामुळे काही जण फक्त स्वप्न म्हणून पाहात असतात. पण तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर 20 लाखांपर्यंत तुम्हाला सरकारकडून मदत मिळू शकते.
चला जाणून घेऊ कर्जाच्या योजना आणि टप्पे..
शिशु कर्ज- 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.
किशोर कर्ज – 5 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
तरुण कर्ज- 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
तरुण प्लस- 20 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असलात तरी, मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. कर्जाची एकूण परतफेड कालावधी 12 महिने ते पाच वर्षांपर्यंत आहे. पण तुम्ही कर्ज पाच वर्षांत परतफेड करू शकत नसाल तर तुम्ही त्याचा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढवू शकता. सर्वात चांगली बाब म्हणजे मंजूर कर्जाच्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला व्याज आकारला जात नाही. पण मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारला जातो. श्रेणीनुसार व्याजदर बदलतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असावं. लाभ घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. बँकेचा डिफॉल्ट इतिहास नसावा. ज्या व्यवसायासाठी मुद्रा लोन घ्यायचं आहे, ती कॉर्पोरेट संस्था नसावी.

असं करा मुद्रा योजनेसाठी अर्ज
सर्वात प्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत mudra.org.in या वेबसाईटवर जा. होम पेजवर तीन प्रकारच्या लोनचे पर्याय दिसतील. यात शिशु, किशोर आणि तरुण योजनेपैकी एकाची निवड करा. यानंतर नवं पेज ओपन होईल. त्यावरून अर्ज डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा. अर्ज व्यवस्थितरित्या भरा. यावेळी आधारकार्ड, पॅनकार्ड, व्यवसायाचा पत्ता सांगणारं दस्ताऐवज, इनकम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न कॉपी, पासपोर्ट साईज फोटो वगैरे लावा.
त्यानंतर हा फॉर्म जवळच्या बँकेत जमा करा. बँक अर्जाची छाननी करे आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला लोन देईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मुद्रा लोन वेबसाईटवर लॉगिन करा आणि ऑनलाईन अर्ज करू शकता.