विटा एमडी ड्रग प्रकरणातील फलटणमधून पकडलेल्या तिघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सध्या गुन्हेगारी प्रकारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. विट्यात सध्या खूपच चिंतेचे वातावरण आहे. कारण नुकतेच येथे एमडी ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. विट्यातील एमडी ड्रग कारखाना प्रकरणातील फलटण मध्ये पकडलेल्या संशयित जितेंद्र शरद परमार, अब्दुल रज्जाक अब्दुलकादर शेख आणि सरदार उत्तम पाटील या तिघांना ७फेब्रुवारी विट्याच्या विशेष जिल्हा सत्र न्यायाल याने आणखी पाच दिवस म्हणजे १२ फेब्रुवारी पर्यंत कोठडी वाढवली.सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या तिघांना ४ फेब्रुवारीला फलटणमधून अटक केली होती. या प्रकरणी रहुदीप बोरिचा (रा. कोसंबा, जि. सुरत), सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई), बलराज अमर कातारी (२४, रा. विटा) या तिघांना अटक केली होती. हे तिघेही १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

तर आता जितेंद्र परमार, अब्दुल रज्जाक शेख आणि सरदार पाटील या तिघांनाही आता १२ फेब्रुवारीपर्यंतची कोठडी देण्यात आली आहे. तर विट्यातील संबंधित रामकृष्ण हरी माऊली कारखान्याची मालकीण गोकुळा पाटील यांची १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी आहे. आता पर्यंत सात जणांना अटक झाली आहे. याप्रकरणी आता मुंबई, गुजरातसह दिल्ली कनेक्शनही समोर आले आहे. दरम्यान, यातील संशयितांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली.

जामिनावर बाहेर आल्यानंतर संशयितांनी एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी रहुदीप बोरिचा याने दिल्लीहून मशिनरी मागविली. त्याचे पैसे सुले मान शेख याने कंपनीला पाठविले. मशिनरी खरेदीसाठी जितेंद्र परमार याने पैसे दिले होते. ड्रग्जसाठी आवश्यक वेगवेगळी केमिकल्स वापी (गुजरात) मधून मागविले. या गुन्ह्यात दिल्ली, गुजरात, मुंबईचे कनेक्शन उघड झाले आहे. मशिनरी व केमिकल्स तपासाबाबत पाच पथके मुंबई, दिल्ली व गुजरात येथे तपास करीत आहेत.

दरम्यान, कडेगाव तालुक्यातील शाळगाव- बोंबाळेवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेले एका कारखान्यातील वायू गळती प्रकरण आणि विट्यातील एमडी ड्रग कारखाना प्रकरण यात वापरलेली रसायने अर्थात केमिकल्स हे साम्य असू शकते, असा संशय लोकांमधून व्यक्त केला जात आहे. विट्यातील ड्रग कारखान्यामध्ये वेगवेगळी रसायने एकत्र करून जसे वेगवेगळे सेन्ट्स, फिनाईल, सॅनिटायझर आणि थेट मेफेड्रॉन (एम. डी.) ड्रग तयार केले जात होते, शामगाव बोंबाळेवाडी येथील संबंधित केमिकल फॅक्टरी मध्येही अशाच प्रकारे बनवले जात होते का ? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.