कांदापोहे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोहा पोटॅटो कटलेट, सोपी रेसिपी…

साहित्य

  1. 1 मोठी वाटी जाड पोहे
  2. 3 मोठे उकडलेले आलू
  3. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
  4. 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1/2 चमचा लाल तिखट
  6. 1 चमचा मीठ
  7. 1/4 चमचा हळद
  8. 1/2 चमचा धने पावडर
  9. 1 चमचा आमचूर पावडर
  10. 1 चमचा चाट मसाला
  11. 1 वाटी ब्रेड क्रम्स
  12. 1/2 वाटी मैदा
  13. तळण्याकरिता तेल

कृती

प्रथम जाड पोहे स्वच्छ धुऊन पाणी निथळून घ्या व पाच मिनिटां करिता तसेच घेऊन द्या.

आता एका बाऊलमध्ये कुस्करलेला आलू, भिजवलेले पोहे तसेच क्रमाक्रमाने सगळे साहित्य घालून छान मिक्स करून घ्या. आवडत असल्यास थोडे तीळ घाला.

आता तयार मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन त्याला सिलेंडर अथवा गोलाकार आकार देऊन त्याचे कटलेट तयार करून घ्या. अशाप्रकारे सगळे कटलेट तयार करून घ्या.

आता अर्धा वाटी मैदा घेऊन त्यात थोडे पाणी घालून त्याचा घोळ तयार करून घ्या. तयार कटलेट आधी मैद्याच्या घोळात बुडवून नंतर त्याला ब्रेड क्रम्स लावा.

अशाप्रकारे सगळ्या कटलेटना मैदा आणि ब्रेड क्रम्स ने कोट करून घ्या. तयार कटलेट गरम तेलातून तळून घ्या.