भाजप संघटन बांधणीत शिरोळ, शाहूवाडी, हातकणंगले

भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी राज्यभर गतिमान झाली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघात रेकॉर्ड ब्रेक सदस्य नोंदणी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला शनिवारपर्यंत शिरोळ, शाहूवाडी, हातकणंगले भाजप ची सदस्य नोंदणी नापास अशी चर्चा होती. पण, पास होण्याची संधी या तीन्ही तालुक्यांना अजून कायम आहे. पहावे लागेल पदाधिकारी किती गतिमान होतात. शिरोळ विधानसभा मतदार संघात ३०७ बुधवर ६१४०० सदस्य नोंदणी अपेक्षित आहे. येथे २२,६७२ सदस्य नोंदणी झाली आहे. शाहूवाडी मतदार संघात ३४३ बुथ आहेत येथे ६८,६०० सदस्य नोंदणी अपेक्षित आहे. पण, येथे १८, १९५ सदस्य नोंदणी झाली आहे.

हातकणंगले विधानसभा मतदार संघात ३३४ बुथ आहेत येथे ६६,८०० सदस्य नोंदणी अपेक्षित होती मात्र, येथे १७,३०० सदस्य नोंदणी झाल्याचे सांगण्यात येते आहे .शिरोळ विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीची ५० हजार मते एकगट्टा आहेत, असे नेते म्हणतात. प्रत्येक निवडणुकीत हा आकडा ट्रकातून बाहेर येतो आणि चर्चेला वाव देतो. हॉटेलात बैठका होतात, जयसिंगपुरात बैठका झडतात, करारही होतो. मात्र, सदस्य नोंदणी २२,६७२ वरुन पुढे का जात नाही? असा बाकी सवाल जयसिंगपूरच्या भाजी मंडईत शनिवारी होता.

दरम्यान, सदस्य नोंदणी धिम्या गतीने सुरु असल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांच्यावर नाराज आहेत, अशी चर्चा यड्राव, शिरोळ आणि जयसिंगपुरात अधिक प्रमाणात आहे. त्याचमुळे कदाचित जयसिंगपुरातील नेत्याला आणखीन एक पेढा हात पुढे करून मागावा लागला, अशी चर्चा होती. एकंदरीत सध्या तरी जयसिंगपूर, शिरोळ आणि यड्रावमध्ये सदस्य नोंदणीसाठी कशी गती मिळते हे पहावे लागणार आहे.