हातकणंगले तालुक्यातील रुकडीत गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक…

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे हातकणंगले पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गांजा विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करत ७०० ग्रॅम गांजा जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले. अशोक तिवडे (वय ६५, रा. रुकडी) व गणेश उर्फ गणीभाई भगवान आवळे ( वय ३८, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्या दोघा संशयीत आरोपींची नावे आहेत. हातकणंगलेचे पोलीस अंमलदार अतुल निकम यांना रुकडी येथील खत कारखान्यासमोर एका घराच्या आडोशाला एक व्यक्ती गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, गुन्हे शोध पथकाने पंटर पाठवून खात्री केल्यानंतर सपोनि सुनील माने, पोलीस कर्मचारी अतुल निकम, सागर पोवार, विकास घस्ते तसेच चालक मारुती गावडे यांनी छापा टाकून संशयीत आरोपी अशोक तिवडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता गणेश उर्फ गणीभाई भगवान आवळे याच्याकडून गांजा विक्रीसाठी आणले आहे असे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी लगेचच कवठेपिरान येथे जाऊन गणीभाई आवळे याला अटक केली. या कारवाईत ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक पिलाने, गुन्हे शोध पथकातील अतुल निकम, सागर पोवार, विकी भंडारे, समीर मुला, विकास घस्ते, चालक गावंडे, विठ्ठल जाधव यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने करत आहेत.
.