लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्क्य मिळाले. इचलकरंजी शहरात अनेक भाजप कार्यकर्ते आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. राहुल आवाडे भाजपातर्फे निडणुकीत उतरले आणि ते विजयी देखील झाले. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपने दणदणीत यश मिळविले. या विजयानिमित्त भाजपच्यावतीने शहरात साखर पेढे वाटत व फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपच्या विजयाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य म ार्गावरुन घोषणा देत दुचाकी रॅली काढली.
मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते साखर पेढे वाटण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर तेथून आमदार राहूल आवाडे, महादेव हाळवणकर, भाजपा शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. शिवतीर्थ येथे फटाक्यांची आतषबाजी करीत भाजपच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला. मलाबादे चौकात भाजप कार्यालयासमोर माजी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते नागरिकांना साखर पेढे वाटत दिल्लीतील भाजपच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शहराध्यक्ष पै अमृत भोसले, अनिल डाळ्या, महादेव हाळवणकर, जयेश बुगड, राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला, पांडुरंग म्हातुकडे, शेखर शहा, बाळासाहेब कलागते, ऋषभ जैन, अरविंद शर्मा, उमाकांत दाभोळे, अनिस म्हालदार संजय गेजगे, सलीम शिकलगार, राजु भाकरे, मनोज जाधव, राजू बोंद्रे, विकास चौगुले, विजय हावळे, प्रमोद बचाटे, भारत बोंगार्डे, अरुण कुंभार, मनिष आपटे, दीपक कडोलकर, अतुल पळसुले, सचिन कोरे, भगवान बरगाले, विजय कांबळे, राजु पुजारी, श्रेयश गट्टाणी, हर्षवर्धन गोरे, नितीन पडियार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.