विट्यात वैभव पाटलांनी सुरू केले व्यसनमुक्ती अभियान, अंमली पदार्थ तंबाखूजन्य नशेली पदार्थाचा नायनाट करण्याची घेतली शपथ…..

सध्या अनेक भागात अवैध धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. या अवैध धंद्यांना तरुणाई बळी पडू लागलेली दिसत आहे. विटा शहरात नुकतेच ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे विटा शहर हादरून गेले आहे. देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटे शहरात महाविद्यालयीन तरुण या गोष्टींच्या विळख्यात अडकून त्यांचे भविष्य अंधकारमय होवू शकते. खुलेआम गांजा ड्रास इत्यादी नशेली पदार्थ सापडत असतील तर ही शहराच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे.

विटा शहर सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते आणि या नगरीत असले काळे धंदे खून मारामाऱ्या सुरू राहिल्या तर शहराच्या नावाला वेगळे नाव पडेल यासाठी एक लोकप्रतिनिधी व समाजसेवक म्हणून मी या सर्व गोष्टी विटा शहराबरोबरच संपूर्ण मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी व्यसनमुक्ती महाअभियान सुरू केले आहे. परिसरातील सर्व शाळा महाविद्यालयात आमची टीम व काही स्वयंसेवक जाऊन त्या ठिकाणी जनजागृती करतील व व्यसन करणारच नाही म्हणून त्या ठिकाणी शपथ देण्यात येईल.

या अभियानाची सुरुवात आमच्या लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संपूर्ण आदर्श संकुलात केलेली आहे भविष्यात प्रत्येक शाळेत वा महाविद्यालयात जाऊन याबाबत जनजागृती करून या भयावया प्रसंगातून देशाची भावी पिढी आम्ही बाहेर काढणार व परिसरात अंमली पदार्थ तंबाखूजन्य नशेली पदार्थाचा नायनाट करणार असे वैभव पाटील यांनी आदर्श महाविद्यालयात अभियानाच्या उद्घाटन समारंभात सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभागी होवून शपथ घेतली.