कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुस समिती यांच्यावतीने उरसानिमित्त गुरुवारी (४ एप्रिल) सकाळी ८ वाजता लहान गट पळण्याच्या शर्यती, ९ वाजता मोठा गट पळण्याच्या शर्यती, ९.३० वाजता सायकल शर्यतीचे आयोजन केले आहे.
शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी ९ वाजता आदत जनरल गट बैलगाडी शर्यती, ९.३० वाजता जनरल ”ब” गट, जनरल ”अ” गट बैलगाडी शर्यती तसेच दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन केले आहे.
शनिवारी (६ एप्रिल) दुपारी ४ वाजता मोटारसायकलबरोबर म्हैस पळवणे शर्यती, रविवारी (७ एप्रिल) दुपारी ४ वाजता शिवशंभू मर्दानी दांडपट्टा मंडळ, कबनूर व जय भवानी व्यायाम मंडळ, इचलकरंजी यांची मैदानी खेळाची प्रात्यक्षिके तसेच दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे.
मंगळवार (९ एप्रिल) सकाळी ९ वाजता गावगन्ना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे.
