काव्या गायकवाड हिचे यश

आष्टा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर बाराची विद्यार्थीनी कु. काव्या समीर गायकवाड हिने राज्यस्तरीय टी एस इ परीक्षेत गुणवत्ता यादीत सर्वसाधारण  तिसरा क्रमांक प्राप्त करून सुयश संपादन केले.

या परीक्षेत शाळेतील १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. याबरोबर भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत काव्या केंद्रात प्रथम आली  असून जिल्हा गुणवत्ता शोध परीक्षेत ९२ गुण  मिळवून यशस्वी झाली आहे. या परीक्षेत शाळेतील २१ विद्यार्थी गुणवत्ता  यादीत आले आहेत. कु. काव्यासह सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. प्रेरणा पाटील, वर्गशिक्षिका नाझिया पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.