प्रशासकीय पूर्तता होऊन देखील सभागृह होत नसल्याने वीरशैव बांधव संतप्त, लाक्षणिक उपोषण

लोकप्रतिनिधी मा. आम. अॅड. शहाजीबापू पाटील  यांनी सांगोला शहरातील वीरशैव लिंगायत समाजाला बहुउद्देशीय सभागृह बांधून देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ८५ लाख रुपये निधी मंजूर केला. यावर सांगोला नगरपालिका प्रशासनाने रीतसर परवानगी घेत ठेकेदारांवर पावर देऊन काम सुरू करण्यासंबंधी सूचना दिल्या. तथापि इतर समाजातील काही लोकांच्या हरकतीमुळे सदर काम बंद पडले होते. बंद पडलेले वीरशैव लिंगायत समाज बहुउद्देशीय सभागृह हे बांधकाम तात्काळ पूर्ण करून द्यावे अशा प्रकारची मागणी करत सांगोला शहरातील वीरशैव बांधवांनी हे उपोषण सुरू केले आहे.

सांगोला शहरातील वीरशैव लिंगायत समाजाला बहुउद्देशीय सभागृह बांधून देण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईला कंटाळून लिंगायत बांधवांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवार दि. १४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. उपोषण स्थळी वीरशैव बांधवांसह समाजातील महिला उपस्थित होत्या. 

सांगोला वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय सभागृहाची मागणी होत होती. या मागणीला अनुसरून सन २०२१ – २२ मध्ये सांगोला नगरपालिका प्रशासनाने समाजाला शहरातील शिवाजी चौकामध्ये नगरपालिकेच्या नावे असलेल्या जागेत सभागृह बांधण्यास परवानगी दिली. या बांधकामासाठी लागणारा निधी तत्कालीन 
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी माजी पालक मंत्री, आमदार विजयकुमार मालक देशमुख,

माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, नरेंद्र गंभीरे, भाजपचे नेते श्रीकांत देशमुख यांनी भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रशासनाने योग्य मार्ग काढून लिंगायत समाजाला न्याय मिळवून द्यावा असे आव्हान केले. माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी उपोषण कर्त्यांशी संपर्क करून त्यांचे मत जाणून घेतले व यावर योग्य तो तोडगा काढून निर्णय दिला जाईल असे सांगत उपोषण मागे घेण्यास सांगितल्याने वीरशैव लिंगायत समाजाचे उपोषण मागे घेतले.