आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अनेक भक्त बाप्पांच्या दर्शनासाठी गणपती मंदिरात गर्दी करत आहेत. इचलकरंजी शहरातील पंचगंगा वरद विनायक मंदिरात आज संकष्टी निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंचगंगा नदी तिरावरील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात आज रविवार ता. १६ रोजी संकष्टीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
संकष्टीनिमित्त मंदिरात सकाळी ८ वाजता आरती, सकाळी ११.३० नंतर खिचडी वाटप, सायंकाळी ७ वाजता आरती व रात्री ९.४३ ला चंद्रोदय झाल्यानंतर आरती होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या भक्त मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले आहे