इचलकरंजीत कला महोत्सवाचे प्रदर्शन आज रात्री ९ पर्यंतच!

इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे श्री देवांग समाज व हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोष्टी कला महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटन समारंभ श्री देवांग समाज अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली व राजेंद्र सांगले, रमेश कबाडे, मधुकर वरूटे, गजानन होगाडे, महेशराव सातपुते, दत्तात्रय ढगे, विजय मुसळे, प्रशांत सपाटे, व्ही. आर. . कुलकर्णी, हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल सरबी, कोष्टी कला महोत्सवाचे अध्यक्ष हेमंत कबाडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

सदर कला महोत्सवात एकूण ३५० कलाकृती पहावयास उपलब्ध आहेत. शिल्पकलेतील उत्कृष्ट कलाकृती तसेच ललित कला महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांचाही कलाकृती तसेच इंम्प्रेशन फोटोग्राफी क्लब यांची मनमोहक अनेक विषयांची फोटोग्राफी पाहण्यास उपलब्ध आहेत.

कला महोत्सवाचे प्रदर्शन १९ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले राहणार आहे. महोत्सव यशस्वी होण्यासाठी निखिल करोशी, संजय आगलावे, अशोक वरूटे, प्रमोद वरूटे. लक्ष्मीकांत नखाते, राजेश उरणे, सौ. सुलभा कबाडे, सौ. विद्या वरूटे, सेजल कांबळे, अमृता फाटक व ललित कलाचे प्राचार्य व्ही. आर. कुलकर्णी यांनी परिश्रम घेत आहेत.