महाराष्ट्राच्या सामाजिक विकासात भर घालणारे उद्योग व्यवसायासाठी महत्त्वाकांक्षी व भविष्याचा वेध घेणारे विचार आणि क्षमता नक्कीच चालना देणारे ठरताहेत. कार्यकर्त्यांना स्नेहाची वागणूक देणाऱ्या हसतमुख नेतृत्वास म्हणजेच आमदार जयंतराव पाटील यांना उदंड दीर्घायुष्य, आरोग्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्राचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राज्याला दिशा देणारे नेतृत्व आहे. याचे भान ठेवून वाळवा इस्लामपूर मतदारसंघातून त्यांना सातत्याने निवडून दिले जाते. इस्लामपूर मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा फलद्रूप करण्यासाठी सदोदित प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे जनसामान्यांचे दैवत व आधारवड म्हणजे जयंतराव पाटील साहेब. मतदारसंघातील बेरोजगारी दूर करण्यासाठी समाजातील उद्योगधंदे उभारू इच्छिणाऱ्यांना किंबहुना उद्योगधंदे उभारलेल्या सर्वांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. व्यवसायात येणाऱ्या चढ- उतारांना सामोरे जाण्याचे धैर्य देतात.
जयंतराव पाटील साहेब हे उद्योग, व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणारे व उद्योजकांच्या पाठीशी राहणारे प्रेरणास्रोत आहेत. कर्तव्यदक्षता, व्यासंगी व्यक्तिमत्त्व, वात्सल्यभाव, मिश्कील व आकर्षक वाणी, कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे, शिस्तप्रिय मार्गदर्शक, बहुश्रुत आणि बहुज्ञानी प्रेरणास्रोत व कुशल संघटक असलेल्या साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला असे विशेष सप्तरंग लाभलेले दिसून येतात.
राज्याचे अर्थकारण सांभाळत असताना नवनवीन योजना राबविताना तालुक्यात व जिल्ह्यात उद्योगधंद्यांना निधी कमी पडू नये म्हणून कटाक्षाने त्यांनी प्रयत्न केले. गृहमंत्रिपदाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेथे पोलिसांची पुनर्रचना करण्याचा पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रात्रे पुरविण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह ठरला होता. जलसंपदामंत्री असताना अनेक बंद पडलेले जलसिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात ते यशस्वी झाले. महाराष्ट्रातील पाणीदार मंत्री अशी त्यांची ख्याती निर्माण झाली.