लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र समोर आले. अनेक पक्षप्रवेश देखील पहायला मिळाले. सांगोला तालुक्यात देखील अशीच राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र समोर आले. सांगोला तालुक्यात आमदारपदी डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड झाली. सध्या सांगोला तालुक्यात अनेक विकासकामे सुरु आहेत. सांगोला तालुक्यात स्व. बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या उध्दघाटनास नामदार राधाकृष्ण विखे पाटील येणार म्हटल्यावर महुद येथे हेलीपॅडवर मंत्री महोदयांच्या स्वागतास आमादर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापु पाटील, माजी आमदार दिपक (आबा ) साळुंखे पाटील व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर थांबले असता मंत्री महोदयास येण्यास वेळ असल्याने हे चौघे नेते एकाच गाडीत बसुन चर्चा करीत असताना असतानाचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी शहाजीबापुंनी आपल्या हातातील घड्याळ काढुन दिपक (आबा) यांना दिले. तर रणजितसिंह निंबाळकर यांनी आपले घड्याळ बापुंना दिले व दिपकआबांनी आपला गॉगल रणजीतसिंह निंबाळकरांना दिला.
मात्र आमदार बाबासाहेबांनी आपल्या घरुन आणलेला जेवणाचा डबा आणुन तो तिंन्ही नेत्यांना बरोबर घेऊन जेवणाचा आस्वाद घेतला. तो क्षण उपस्थित अनेक लोक पहात होते. तोच क्षण निंबाळकरांनी आपल्या भाषणात कथन केला. यावरुन राजकारण हे निवडणुका पुरते असते ईतर वेळेस एकदिलाने काम केले पाहीजे हा स्व.आबासाहेबांचा विचार सांगोला तालुक्याने जपलेला आहे हे पहावयास मिळाले. लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख हे स्व. आबासाहेबाप्रमाणे साधी राहाणीमान जपतात व आमदार असुनही सर्वसामांन्य जिवनशैली आवलंबतात त्यांनी घरुन आणलेल्या जेवणाच्या डब्याची चर्चा संपुर्ण जिल्हाभर होत आहे
