लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?

फेब्रुवारी महिन्यात आणखी दोन लाडक्या बहि‍णींच्या अर्जाला कात्री लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत आणखी दोन लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे.

चार चाकी, टॅक्स भरणाऱ्या, जमीन असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या छाननीनंतर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा अर्ज बाद केलेला असेल.