आमदार जयंतराव पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी अनेक भागात साजरा करण्यात आला. इस्लामपूर येथे आमदार जयंत पाटील वाढदिवसानिमित्त राजारामनगर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपचा २३वा संगीत महोत्सव उद्या शुक्रवारी दि. २१ व शनिवारी दि. २२ सायंकाळी ७ वाजता इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे. दि. २१ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसविणारी मनोरंजनाची हास्ययात्रा, तर दि. २२ रोजी कोमल कृष्णा प्रस्तुत सितारोंकी मैफल हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आविष्कारचे अध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले यांनी दिली. ते म्हणाले, शुक्रवारी मनोरंजनाची हास्ययात्रामध्ये चतुरस्र कलाकार समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट, प्रभाकर मोरे, दत्तू मोरे, प्रथमेश शिवलकर हे हास्याची मेजवानी देतील.
नृत्यांगना मीरा जोशी यांचा लावणी नृत्याविष्कार, सिनेअभिनेते पुष्कर श्रोत्री यांचे सूत्रसंचालन आणि अधून-मधून सुमधुर गीतांनी ही संगीत मैफल रंगणार आहे. शनिवारी सितारों की मैफीलमध्ये इंडियन आयडॉलफेम अंकुश भारद्वाज, कोमल कृष्णा (पुणे), निरूपमा डे (मुंबई), श्रीशान वाडेकर (मुंबई) यांचा हिंदी- मराठी गीतांची संगीत रजनी होईल.
आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष भूषण शहा, उपाध्यक्ष राजेंद्र माळी, सचिव विजय लाड, विजय नायकल, विश्वास कदम, सतीश पाटील, सुनील चव्हाण, संतोष पाटील, प्रा. प्रदीप पाटील, धनंजय भोसले, विश्वनाथ पाटसुते, विनायक यादव, लव्हाजी देसाई, महेश पाटील, ज्ञानदेव देसाई, हर्षवर्धन घोरपडे, सौरभ सावंत, अजय थोरात, श्रेयस पाटील, प्रताप कवठेकर संयोजन करत आहेत. आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा शक्रवारी व शनिवारी जास्त जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.