आजपासून १० वीची परीक्षा सुरु झालेली आहे. यासाठी सांगोला तालुक्यातील १५ परीक्षा केंद्रावर ५ हजार २१७ विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातर्फे घेतली जाणाऱ्या १० वी परीक्षेचा आज पहिला मराठी विषयाचा पेपर ११ ते २ यावेळेत पार पडत आहे. सांगोला तालुक्यातील १५ परीक्षा केंद्रावर घेतल्या जाणाऱ्या पेपरसाठी ५ हजार १२७ परीक्षार्थी विद्यार्थी सामोरे जात आहेत. परीक्षा केंद्रातून दहावीची परीक्षा देणार आहेत.
परीक्षांमधील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसविण्यासाठी परीक्षा मंडळाकडून केंद्र संचालकांना परीक्षा कॉफिमुक्त व निर्भयपणे पार पाडण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करून योग्य ती खबरदारी घेतली आहे. परीक्षा कालावधी मध्ये केंद्रावर पोलिस बंदोबस्त, बैठे पथक, आरोग्य विभागाचे अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून तालुका व जिल्हा भरारी पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. ज्या केंद्रावर मागील चार पाच वर्षात गैरप्रकार झाला असेल अश्या सेन्सिटिव्ह केंद्रावर परीक्षा मंडळ व शिक्षण विभाग लक्ष ठेवून असणार आहे.
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात एसटीडी, फॅक्स, झेरॉक्स, मोबाइल यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तर प्रथमच बोर्ड परीक्षेवर सी. सी. टी. व्हीं व मोबाईल कॅमेराची नजर असणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर काम करणारे पर्यवेक्षक, केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक याना परीक्षा केंद्रावरील सर्व हालचालीची चित्रफित पेपर संपेपर्यंत लाईव्ह दाखवावी लागणार असल्याचे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
