भिवंडीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, भिवंडीत एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षा चालक यांना मारहाण करत पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
भिवंडीमध्ये एका बावीस वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.पीडित तरुणीचा भाऊ व रिक्षा चालक यांना मारहाण करून पीडित तरुणीवर बलात्कार करण्यात आला. भिवंडीतल्या बागे फिरदोस परिसरातून तरुणीचं भावासह अपहरण करण्यात आलं, त्यानंतर नागाव परिसरातील झाडाझुडपात या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर फातिमा नगर परिसरात देखील एका पिकप बोलेरो गाडीत पीडितेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आधी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास शांतीनगर पोलीस करत आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.