हातकणंगले तालुक्यातील विकासासाठी खा. धैर्यशील आणि देवमोरे आले सोबत…

हातकणंगले तालुक्यात अनेक विकासकामांना व अनेक प्रश्नांना दिशा देण्यासाठी आणि गोरगरिब जनतेची सेवा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवसेना’ पक्षात अजित देवमोरे यांनी जाहीरपणे प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांनी हातकणंगले तालुक्यातील जनतेची सेवा करेन आणि तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावेन असे आश्वासन दिले. यावेळी त्याच्यासोबात कार्तिक चौगुले, त्रिगुण पांडव, शंकर बंडगर, अनिल पाटील, प्रणव पुजारी, आकाश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.