जयंत चषक क्रिकेट स्पर्धेत बूथ १०८ ला विजेतेपद

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित जयंत चषक क्रिकेट स्पर्धेत बूथ क्रमांक १०८ ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेतील सर्व विजेते संघ व उत्कृष्ठ खेळाडूंना आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. सात दिवस चाललेल्या स्पर्धेस खेळाडू व क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. भविष्यात विविध खेळ व खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देवू अशी ग्वाही आ.पाटील यांनी दिली. 

प्रथम- बूथ क्रमांक १०८ (अध्यक्ष मिलिंद पाटील), द्वितीय- बूथ क्रमांक १०६ ( अध्यक्ष सचिन कोळी), तृतीय- बूथ क्रमांक १२३ (अध्यक्ष संभाजी बावर) चतुर्थ- बूथ क्रमांक १२९ (अध्यक्ष विजय जाधव), विजेत्या संघांना अनुक्रमे रुपये २५, १५, १०, ७ हजार रोख रक्कम, भव्य सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात आले. यश पाटील यांनी स्पर्धेत १०६ धावा व ६ विकेटचा खेळ करीत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकाविला. उत्कृष्ठ खेळाडू- बेस्ट बॉलर- विशाल केसरकर (७ विकेट), बेस्ट बॅट्समन- दिग्विजय जाधव (९४ धावा), अंतिम सामन्यातील मॅन ऑफ मॅच निहाल मुल्ला (सलग चार चौकार).