सध्या अनेक भागात सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजिले जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. वाळवा तालुक्यातील फारणेवाडी येथे लक्ष्मी मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त बुधवार २६ व गुरुवार २७ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेली २४ वर्षे झाली अविरतपणे महाशिवरात्री निमित्त शिवलीलामृत ग्रंथ पारायण सो- हळा आयोजित केला जात आहे अशी माहिती संयोजकांनी दिली. यावेळी बुधवार २६ रोजी पहाटे ४ ते ६ महापूजा, महाभिषेक, सकाळी ७ ते ७:३० विना पूजन, ७:३० ते ७:४५ कलश पूजन, ग्रंथ पूजन, ८ ते सायंकाळी ५ शिवलीला ग्रंथ वाचन, सायंकाळी ६ ते ७ साधुबुवा मुक्ताई महिला भजनी मंडळ हरिपाठ, ७ ते ७:३० दीपोत्सव होणार आहे.
रात्री ९:३० ते १:१५ पर्यंत संगीत शास्त्रीय भजन. गुरुवार २७ रोजी सायंकाळी ७ वा. सकाळी ९ ते ११ संगीत भजन सायंकाळी ७ वा. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. व्यासपीठ चालक म्हणून हभप. भिकाजी सिद्ध, हभप. काकासो देशमुख, हभप. नागेश देशमुख हे काम पाहणार आहेत. वरील सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक शिवाजी राजाराम खोत यांनी केले आहे.