आटपाडी, तडवळे ते आटपाडी मार्गावर भिंगेवाडीजवळ कृषी विद्यालयासमोर १३ संप्टेंबर २०२५ रोजी मोटारीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पादचरी तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मोटार चालक अमोल विजय सरगर (वय २९,रा. करगणी , ता. आटपाडी ) यांच्याविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामचंद्र मरगळे (वय ३३, रा. तडवळे ) असे मृताचे नाव आहे. १३ सप्टेंबररोजी सायंकाळी सात वाजता तो रस्त्याने चालत जात होता. यावेळी अमोल सरगर याच्या मोटारीने (क्र. एमएच १० बीएफ ९६६६ )अनिल यांना जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर दुखापत होऊन अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत त्यांचे भाऊ बाळासाहेब रामचंद्र मरगळे (वय ३८, रा. तडवळे ) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. पुढील तपास आटपाडी पोलिस करीत आहेत .
अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा
