गांजाची टीप दिल्याच्या संशयातून झरे येथे मित्रास मारहाण, गुन्हा दाखल

अलीकडच्या काळात अनेक गुन्हेगारीच्या प्रकारात खुपच वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथे मित्राने पोलिसांना गांजाची टिप दिल्याचा संशयातून आठ ते नऊ जणांनी मित्राला मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झरे येथील इरळी फाट्याजवळ राजवीर चायनिज सेंटर समोर घडली.

याबाबत अमृत मोहन कोळी (वय, २७) याने आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार विजय पाटील, रोहित पाटील, सरेश पाटील, महादेव पाटील (सर्व रा. चौघे रा. झरे, ता. आटपाडी) सुशांत गोरड, करण गोरड, विशाल नलवडे व चायनिज आचारी (सर्व रा. विरळी, ता. माण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


संशयित विजय व फिर्यादी अमृत हे दोघे मित्र आहेत. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना गांजाची टिप दिल्याचा विजय यास संशय होता. या कारणांवरुन विजय याने बेकायदेशीर जमाव जमवून किरण गोरड याने व चायनीज आचाऱ्याने अमृतला मारहाण करत जखमी केले व इतर संशयितांनी लाथाबुक्क्यांनी अमृत व त्याचा मित्र तुषार पुणेकर व साहील अनुसे यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. करणं गोरड याने अमृतच्या गळ्यातील चेन काढून घेतली.