कोरोची ग्रामदैवत मारुती यात्रेला उत्साहात सुरुवात; १ मार्च पर्यंत भरणार यात्रा

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन यात्रेनिमित्त करण्यात आलेले आहे. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील श्री मारुती देव श्री गुरु महाराज श्री महादेव व लंगरी साहेब उरूसा सुरु झालेला आहे. कोरोची येथील ग्रामदैवत श्री मारुती देव श्री गुरु महाराज श्री महादेव व लंगरी साहेब उरूसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी ७ वाजता – -सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या हस्ते ग्रामदैवत मारुती देवास महा अभिषेक घालण्यात आला. व जागृत ग्रामदैवत महादेव शिवलिंगावर महाभिषेक उपसरपंच तृणाल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. व महारथी करून भव्य आतषबाजी करण्यात आली व यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.

आज गुरुवार भर यात्रा असून गावातील सर्व देवांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जाणार आहे. तसेच सायंकाळी चार वाजता बैलगाडीतून ऊस लुटण्याचा कार्यक्रम व रात्री ९ वाजता ग्रामदैवता मारुती देवाची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. व रात्री १० वाजता कोमल कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. यात्रा १मार्च पर्यंत भरणार आहे.