सध्या अनेक भागात विविध विकासकामे, समस्या दूर करणे त्याचप्रमाणे अनेक विविध योजना राबविल्या जात आहे. युवा विजय महाराष्ट्र दौरा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शुभारंभ करून दौऱ्याला सुरुवात झाली.
आटपाडी येथे युवासेना शाखेचे उद्घाटन सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर कार्यकारणी सदस्य शिवाजी जाधव जिल्हाध्यक्ष मिलिंद कदम, रोहन जाधव, सचिन कांबळे यांच्या उपस्थित शाखा उद्घाटन झाले.
यावेळी तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मनोज रमेश कातुरे पाटील, शहाजी जाधव, उपसभापती सुनील सरक, महादेव चव्हाण, पोपट पाटील, राजेश नांगरे पाटील, मुन्नाभाई तांबोळी, शंकर चव्हाण, दत्ताजीराव देशमुख, विजय देवकर, राहुल पांढरे, दौलत चव्हाण, संतोष लांडगे जगन्नाथ लोखंडे, ब्रह्मदेव होनमाने, मधुकर ठोंबरे भगवान पाटील, अनिल मुढे, अमोल लांडगे, कल्याण काळे संभाजी जाधव वैभव बोराडे, बालाजी पाटील गोपी पवार, अक्षय बनसोडे, विकास गायकवाड उपस्थित होते.