मार्चमध्ये शालेय विद्यार्थ्यांची मजा! होळीपासून ईदपर्यंत केव्हा बंद असणार शाळा? जाणून घ्या

फेब्रुवारी महिना संपायला आलाय. 28 दिवसांचा हा महिना संपल्यानंतर मार्च महिना सुरु होईल. प्रत्येक महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरांपासून बॅंकांच्या नियमांपर्यंत काही ना काही बदलत असते. या सर्वात शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सर्वात जास्त उत्सुकता आगामी महिन्यात सुट्ट्या किती असणार याची असते. मुलांना सुट्ट्यांमध्ये मज्जा करायला मिळते आणि पालकांना त्याअनुषंगाने फिरण्याचे प्लान आखता येतात. मार्च महिन्यात किती सुट्ट्या असतील? सविस्तर जाणून घेऊया.

मार्च महिन्यात होळीपासून ईद उल फितरपर्यंत अनेक सुट्ट्या आहेत. जेव्हा शाळा बंद असतील. प्रत्येक राज्यातील सुट्ट्या या तिथल्या स्थानिक सणांवर ठरतात. त्यामुळे राज्यांनुसार या सुट्ट्या बदलत जातात. शाळांना कधी सुट्ट्या असतील? सविस्तर जाणून घेऊया.

मार्च महिन्यात होळीपासून जमात उल विदा, गुढी पाडवा आणि ईद उल फितर सारखे प्रमुख सण आहेत. 13 मार्चला गुरुवारी होलिका दहन आणि 14 मार्चला शुक्रवारी होळी आहे. या 2 दिवसात शाळांना लागोपाठ सुट्ट्या असतील. तर 28 मार्चला शुक्रवारी जमात उल विदाची सुट्टी शालेय विद्यार्थ्यांना असेल. यानंतर 30 मार्चला रविवारी गुढी पाडवा आणि 31 मार्चला सोमवारी ईद उल फितरची सुट्टी असेल. या दिवशी शाळा बंद असतील.

महिन्यातील 4 रविवार शाळांना सुट्टी असते. याव्यतिरिक्त काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शनिवारचीदेखील सुट्टी असते. अशा विद्यार्थ्यांना मार्चमध्ये या सुट्ट्यांचा आनंदही घेता येणार आहे.

एप्रिल महिन्यात रविवार, 6 एप्रिल रोजी राम नवमीची सुट्टी, 10 एप्रिलस गुरुवारी महावीर जयंतीची सुट्टी आणि 18 एप्रिल शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी असणार आहे.