हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील धनाजी खुडे याला दोन महिन्यांपूर्वी प्रविण मगदूम याने कबनूर येथून फिर्यादी आनंदा जर्मनीने बोलविल्याचे सांगत शंभुराजे कॉर्नर येथील एका टॅटुच्या दुकानात नेले. त्याठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्याला खुडे याने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्याच चारचाकी वाहनातून आनंदा व प्रविण यांनी सोन्या मारुती चौक येत असताना खडे याच्याकडील ७८ हजाराचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले.
सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे याने त्याच्याकडे ५ लाखाची मागणी केली. त्यावेळी खुडे याने नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्तीने त्यास शिवीगाळ करत कानशिलात लगावली. तर आनंदा जर्मनी याने चाकू काढ, याला कर्नाटकात नेऊन भोसकुन टाकुया, उचलून आणल्याचे कोणी पाहिले नाही, त्यामुळे काही विषय नाही असे सांगितले. त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे यांना प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केले.
संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण खुडे बचावला. या प्रकरणी खुडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी प्रविण मगदूम याला डिसेंबरमध्येच अटक करण्यात आली आहे. तर अन्य तिघांचा शोध सुरु होता.यापैकी आनंदा जाधव व अक्षय कोंडुगळे या दोघांना सातार शहर पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली असून ते २७ फेब्रुवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांची शिवाजीनगर पोलिसांना आवश्यकता असल्याने त्यांचा ताबा मिळणेबाबत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे विनंती केली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातारा कोर्टाला पत्र देऊन सातारा कारागृहातून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.