इचलकरंजी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाची खातेनिहाय चौकशी करण्यासंदर्भात डॉ. नितीन भाट यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केलेला आहे. या अर्जात भाट यांनी लालबेग यांचाही उल्लेख केलेला आहे. त्यावरुन लालबेग यांनी भाट यांना मोबाईलवर संपर्क साधत चौकशी अर्जातील माझे नांव काढ नाहीतर तुझ्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. कॉ. कांबळे करत आहेत. धमकी दिल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील हेमचंद लालबेग याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. नितीन उदल भाट (वय ३९ रा. शांतीनगर कंजारभाट वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.
