आज पेठवडगाव येथे संकल्प यात्रेचे आयोजन!

केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्या योजनांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा याच उद्देशाने शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने वडगाव शहर व परिसरातील नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा याच हेतूने आज म्हणजेच शनिवार 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत वडगाव नगरपरिषद वडगाव मार्फत नगरपालिका चौक वडगाव येथे संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्यामुळे या सदर यात्रेस नागरिकांनी उपस्थित राहून आभा कार्ड व गोल्डन कार्ड योजनेचा लाभ व माहिती वडगाव शहर व परिसरातील नागरिकांना देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

अधिराज A1 ग्राहक सेवा केंद्र, कल्याणी बाजार शेजारी, बेसमेंटला, शॉप नंबर 25, पेठ वडगाव

संपर्क

अमित : 8600606343