पेठवडगावचा महालक्ष्मी तलाव ओव्हरफ्लो! विधिवत पूजन……

गेली दहा दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे पेठवडगावचा जलाधार असणारा महालक्ष्मी तलाव शनिवारी (दि.२७) पुर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. तलाव भरल्यामुळे शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्याने नागरिक सुखावले आहेत.तलाव पुर्ण क्षमतेने भरला की पुर्वेकडून पाणी बाहेर पडते. ज्या भागाकडून पाणी बाहेर पडते, तो भाग हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा असल्याने पाणी बाहेर पडले की सोंड फुटली असे म्हणतात. ही सोंड फुटली की वडगांव परिसरातील नागरिक तलावाकडे बघण्यासाठी धाव घेतात. यावर्षी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिकांच्यात समाधान व्यक्त होत आहे. सांडव्यावरून पाणी बाहेर पडतानाचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.दरम्यान महालक्ष्मी तलाव भरल्यानंतर पारंपरिक पुजन व ओटी भरणीचा कार्यक्रम माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.