हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे खासदार धैर्यशील माने यांच्या भरघोस निधीतून ८ कोटी ७३ लाख रुपयांच्या कामाचा लोकार्पण शुभारंभ सोहळा खासदार माने यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना खासदार माने म्हणाले, गावच्या पाणंदीच्या रस्त्याना निधी दिला असूनयेत्या काही दिवसात पट्टणकोडोलीला ग्रामीण रुग्णालयही देण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रमादरम्यान पट्टणकोडोलीतील स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होऊन शासकीय नोकरी प्राप्त केलेल्या युवकांचा सत्कार खासदार माने यांच्या हस्ते करण्यात आला तर गावातील पाणंदीसाठी निधी दिल्याबद्दल गावातील शेतकऱ्यांकडून खासदार धैर्यशील माने यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक दिपक तोडकर, स्वागत शिवानंद पणदे तर आभार सचिनकुमार शिंदे यांनी मानले. यावेळी सरपंच अमोल बाणदार, प्रकाश पाटील, बापुसो मोठे, महेशकुमार नाझरे, धीरज भोजकर, अविनाश बनगे, विजयकुमार स्वामी, अभिजित भालबर, कृष्णात मसुरकर, गोगा बानदार, मधुकर पोवार, सुधाकर पोवार, नाना मोठे, रवी आडके, अंबर बनगे, रेखा डुम उपस्थित होते.
