मयत संतोष हा घरातील लोकांना आणि नातेवाईकांना त्रास देत होता. या कारणावरुन शेडगे याने तिघा मित्रांना इचलकरंजी येथे बोलावून विशाळगड येथे पार्टी करण्याचे ठरविले. साक्षीदार राकेश जाधव याला फोन करुन २१ सप्टेंबर रोजी चारचाकी वाहनातून मानोली येथे गेले. तेथे संतोष याला दारु पाजून संशयितांनी त्याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करुन चाकूने गळा कापला होता. त्याचा मृतदेह कोकण दर्शन पाँइटवरुन दरीत फेकला होता. या प्रकरणी मनोलीचे पोलिस पाटील दत्तात्रय गोमाडे यांनी फिर्याद दाखल केली होती. गुन्ह्यातील चाकू आणि मोबाईलही दरीत फेकला होता.
वारुळ येथे कडवी नदीच्या पात्रात रक्ताने माखलेले कपडे फेकून दिले होते. या प्रकरणातील गाईड दिनेशा कांबळे याने व्हिडीओ करुन मित्राला पाठविला होता. त्याने पोलिस पाटील गोमाडे यांनी हा व्हिडिओ पाहून शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार घटनास्थळी तडाके याचा मृतदेह सापडला होता. शाहूवाडीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख तपास अधिकारी होते. त्यांनी खूनप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी १७ साक्षीदार तपासले. चौकशीचे काम सुरु असताना चौथा आरोपी संजय शेडगे हा मयत झाला.
आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तू, पंचनामा, गुन्ह्याची कबुली आदी युक्तिवाद केला. अमीर पन्हाळाकर, रंगराव भोसले, संजय कांबळे, आरती पडळकर, नोडल ऑफिसर तुषार नलवडे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने तिघा आरोपी अब्बास मुल्ला, सुनील बाळू खोत, सिध्दार्थ शांताप्पा म्हेतर यांना जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्याची सक्त मजुरी सुनावली. कोर्ट पैरवी अधिकारी महिला कॉन्स्टेबल सीमा अष्टेकर यांचे सहकार्य लाभले.