शिरोळ ते नांदणी मार्गे इचलकरंजी एस.टी. सुरु करुन च्या प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, गणी अशी मागणी जोर धरु लागली आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनपूर्वी शिरोळ ते इचलकरंजी एस. टी. नियमित सुरु होती.
त्यामुळे शिरोळ येथे विविध शासकीय कामासाठी, शिक्षणासाठी येणारे नागरिक व विद्यार्थी यांची चांगलीच सोय झाली होती. मात्र, लॉकडाऊन नंतरच्या काळात बंद करण्यात आलेली एस.टी. अद्याप सुरुच न झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय वेळेबरोबरच पैशाचाही अपव्यय होत आहे.