शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे सुरू व्हावे, यासाठी सातत्याने लढा उभारल्याबद्दल माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा खानापूर घाटमाथ्यावरील नागरिकांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र माने, सचिन शिंदे, अलिअकबर पिरजादे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर संपूर्ण घाटमाथ्यावर दिवाळी साजरी झाली. या उपकेंद्र मंजुरीसाठी सिनेट सदस्य म्हणून तसेच जनतेतून लढा उभा करून वैभव पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. वैभव पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला व्हावे म्हणून गेले कित्येक वर्ष संघर्ष सुरू होता.
मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असल्याने विद्यापीठाच्या बैठकीत आपल्या सहकारी सिनेट सदस्यांच्या मदतीने प्रथमता है उपकेंद्र खानापूरला होण्यासाठी विद्यापीठ बैठकीत ठराव मंजूर करून घेतला आणि तिथूनच या उपकेंद्राची सुरुवात झाली. प्रशासन स्तरावर मंत्री महोदयांच्याकडून त्यांनी योग्य व अचूक कागदपत्रे रेकॉर्ड तयार करून शासनस्तरावर सादर केले. त्यामुळे कोणतीही अडचण यापूर्वी करून घेतल्यामुळेच आज विद्यापीठाच्या उपकेंद्राला मंजुरी मिळाल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले. आगामी काळात देखील विद्यापीठाच्या उभारणीस आवश्यक असेल ते सर्व सहकार्य करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
